Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्ली चे उद्घाटन !* जळगावकरांसाठी नवी खाऊ गल्ली -.नव्या स्वादाचा अनुभव *जळगाव प्रतिनिधी दि.20 सप्टेंबर – खाऊ गल्ली या उपक्रमातून नागरिकांना वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या हातच्या पारंपरिक, सुगरणींच्या चविष्ट पदार्थांची खाऊ गल्लीमध्ये खास चव चाखता येणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. 22 जुलै रोजी सुरू करण्यात आलेले बहिणाबाई मार्ट व खाऊ गल्ली ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल व त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.* जळगावकरांच्या चवीला नवा रंग आणि महिला बचत…

Read More

*एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन – सेवा पंधरवड्यात धरणगावात थेट लाभवाटप *धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. 19 सप्टेंबर – महिलांच्या हातातील ताकद म्हणजे कुटुंब व समाजाच्या विकासाची हमी आहे. म्हणूनच एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील १४ शिबिरांमधून आतापर्यंत ५,७०० पेक्षा जास्त नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे नमूद करत पालकमंत्री म्हणाले की, शासनाच्या निधीचा व योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे. गावोगावी जाऊन नागरिकांना योजनांची माहिती द्या. मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जनतेच्या डोळ्यातले समाधान हीच…

Read More

*शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभारलेली प्रतिकृती म्हणजे शेतकरी सन्मान शिल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील* लोकसभागातून साकारलेले शेतकरी शिल्प, सौर प्रकल्पाचेही पालक मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ! *धरणगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 19 सप्टेंबर – “शेतकऱ्याचे हे शिल्प म्हणजे त्यांच्या श्रमांचा, घामाचा आणि त्यागाचा खरा गौरव आहे,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांचा सन्मान व्यक्त केला. लोकसभागातून जेसीबी खरेदी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली आणि या जेसीबी चा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा असे स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम अनेक ठिकाणी सुरु असून, जिल्हा “सौरयुक्त” करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकसभागातून धरणगाव…

Read More

*पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील* नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश ! *जळगाव,दि. १ (जिमाका वृत्तसेवा) – पाचोरा तालुक्यातील, वाडी शेवाळे, शिंदाड, सावरा पिंपरी, सातगाव डोंगरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेती पिकांचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल.असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* पाचोरा व जामनेर तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी त्यांनी आज केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण…

Read More

*अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल- पालकमंत्री – गुलाबराव पाटील* पुराच्या पाण्यात मयत झालेल्या किरण सावळे, यांच्या कुटुंबाकडे शासनातर्फे चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त *जळगाव दि १८- ( जिमाका वृत्तसेवा) – मुक्ताईनगर तालुक्यातील, कुऱ्हा – काकोडा, जुना बोरखेडा, राजुर, जोधनखेडा, चिंचखेडा व परिसरात या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, कापूस, मका , सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही, राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांनी दिली.* अतिवृष्टी झालेल्या, भागात शेती पिकाच्या नुकसानाची पाहणी करताना येथील शेतकऱ्यांची व गावकऱ्यांशी संवाद साधतांना…

Read More

सोशल मिडिया ही काळाची गरज आहे आता जमाना बदलत चालला आहे आता प्रत्येक युवकांचा जवळ अँड्रॉइड फोन असल्या मुळे घर बसल्या बसल्या सर्व माहिती आपल्याला मिनिटात समजते आपल्या पक्षाची किव्हा नेत्यांची बाजू मीडिया मध्ये भक्कम पणे मांडणे हे सोशल मिडिया प्रमुख यांचे काम आहे प्रतापराव पाटील मा.जिल्हा परिषद सदस्य जळगाव पक्षाला बळकटी देण्याचे काम कार्यकर्ते करत असतो प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30 लोकांची निवड होणार असून त्याला सुपर 30 थर्टी नाव दिले जाणार आहे सोशल मीडिया सैनिकांना स्पेशल कॅबिन देण्यात यावी जेणे करून काम करण्यात सोपे जाईल लवकरच सर्व मीडिया पदाधिकारी यांना नियुक्ती व जबाबदारी देण्यात येईल मयूर मगर उत्तर महाराष्ट्र…

Read More

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे वृक्षारोपण महोत्सव संपन्न..!* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक व ग्रामपंचायत पाळधी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ग्रामपंचायत पाळधी खुर्द यांच्या मालकीच्या जागेत व रस्त्याच्या कडेला विविध प्रजातींच्या प१५०-२०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेकांना सदरिल वृक्षांच्या संगोपनाची शपथ व प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. कार्यक्रमासाठी, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार धरणगाव, मा. शिक्षणाधिकारी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य सरपंच, ग्रामसेवक तसेच तालुकास्तरीय व जिल्हास्तरावरील विविध शासकीय व निमशासकीय अधिकारी उपस्थित होते‌. कार्यक्रमासाठी मा. संस्था…

Read More

*जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज;* *पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन* *जळगाव, दिनांक 16 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले असून त्यांनी म्हटले की, *“प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे…

Read More

मागासवर्गीय समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध.. जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे. पाळधी प्रतिनिधी… मागासवर्गीय समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करून घरकुल असेल जातीचे दाखले असतील जागेचा आठ नंबर उतारा शासन स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत शिवसेना मागासवर्गी सेना जिल्हाप्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मांडले नन्नवरे हे दोन गाव तालुका धरणगाव येथील मागासवर्गीय समाजाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते रविवारी पार पडलेल्या बैठकीत मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली शासनाच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याचा निर्धार यावेळी केला सदरील बैठकीत शिवसेना मागासवर्गी सेना कार्यकारिणीमध्ये काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या समावेश करण्यात आला. बांभोरी पंचायत समिती…

Read More