Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे – मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील* पाळधी येथे तरुण उद्योजकांसाठी भव्य मार्गदर्शन मेळावा संपन्न *पाळधी / जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ फेब्रुवारी : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मराठी माणूस हा नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा झाला पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे GPS मित्र परिवाराच्या वतीने भव्य रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे…

Read More

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मंजुरी !* पालकमंत्र्यांकडून चालू आर्थिक वर्षातील ₹८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा घेतला आढावा जळगाव, प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी :- जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सन २०२६–२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ₹७५१ कोटी…

Read More

*“विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प”* पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व महिला सक्षमीकरणावर ठोस भर – महाराष्ट्रालाही मोठा लाभ जळगाव प्रतिनिधी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसनशील भारताला विकसित भारताकडे नेणारा दिशादर्शक व संतुलित अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाचे नियोजनबद्ध रूप, उद्योग व उद्योजकतेला प्रोत्साहन, तसेच गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी खंबीर आणि दीर्घकालीन उपाययोजना या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतात. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे रस्ते, रेल्वे, दळणवळण, औद्योगिक वसाहती आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि…

Read More

पाळधी येथे जीपीएस मित्रपरिवार यांच्यामार्फत मोफत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा जीपीएस मित्रपरिवार मार्फत नेहमी च सामाजिक उपक्रम राबविण्यात येत राहतात याच उपक्रमातील एक भाग म्हणून उद्योजक व व्यवसायिकांकरिता पाळधी येथे दि ०५/०२/२०२६ मोफत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे सदर मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सीएमईजीपी व पीएमईजीपी या योजनेबद्दल माहिती देणार आहेत, तसेच बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ तसेच अमृत योजनेबद्दल या मेळाव्यात सर्व शासकीय कर्ज योजनांची माहिती तसेच कर्ज देताना बँकेची भूमिका उद्योग व्यवसायाची निवड, जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणारे अनुदान,विविध महामंडळाच्या योजनांची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात देण्यात येणार…

Read More

*आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटन कृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात *जळगाव, दि. 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे झाले त्यावेळी ते…

Read More

*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतली परिस्थितीची पाहणी *जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.* गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या…

Read More

पाळधी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी : पाळधी येथे जीपीएस मित्रपरिवाराच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन या सभेत घडले. श्रद्धांजली सभेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. कठोर शिस्त, निर्णयक्षम नेतृत्व, प्रशासनावर असलेली पकड आणि सामान्य जनतेसाठी झटणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या राजकीय जीवनातील काही आठवणी व किस्से सांगत…

Read More

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली* *जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.* यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची…

Read More

*जल जीवन मिशन कार्यशाळेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे कौतुक* JJM कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र निधी लवकर देण्याची मागणी, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद *दिल्ली/मुंबई प्रतिनिधी : २७ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय जल जीवन मिशनच्या वतीने ग्रामीण पाईपद्वारे पाणीपुरवठा योजनांच्या संचालन व देखभालीबाबत (Operation & Maintenance) धोरणात्मक संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेस सर्व राज्यांचे मंत्री आमंत्रित होते. या बैठकीत महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सहभाग नोंदवला.* कार्यशाळेदरम्यान गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण पाईप पाणीपुरवठा…

Read More

*गावाच्या लोकसंख्येपेक्षा विकासकामांची गरज महत्त्वाची – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील* ममुराबाद, विदगाव, तुरखेडा, बेळी, जळगाव खुर्द, निमगाव, खिर्डी परिसरात कोट्यवधींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण *जळगाव प्रतिनिधी | दि. २४ जानेवारी – “ग्रामीण भागातील रस्ते, स्वच्छता व सार्वजनिक सुविधा मजबूत झाल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे निधी मंजूर करताना केवळ गावाची लोकसंख्या न पाहता त्या गावाची नेमकी गरज काय आहे, हे पाहूनच कामांना मंजुरी दिली जात आहे. गरज लहान असो वा मोठी, प्रत्येक काम महत्त्वाचे आहे. गावाचा विकास हवा असेल तर गावात एकजूट असली पाहिजे. मतभेद असू शकतात, पण विकासाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यावे. तुमच्या प्रत्येक चांगल्या कामासाठी मी पालकमंत्री म्हणून…

Read More