पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ रील बनवण्याच्या नादात हर्षल ननवरे आणि प्रशांत खैरनार या दोन तरुण मुलांचा अहमदाबाद एक्सप्रेसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मी तातडीने घटना स्थळ गाठले. ऐन उमेदीच्या वयात आपल्या भागातील दोन मुलांचा असा दुर्दैवी अंत होणे, ही बाब एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मी ननवरे आणि खैरनार कुटुंबाच्या दुःखात मनापासून सहभागी आहे. ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कुटुंबांना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. या दुःखद घटनेच्या निमित्ताने, मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि त्यांच्या पालकांना कळकळीची विनंती करू इच्छितो की, सोशल मीडियावरील रील बनवण्याचा मोह जीवापेक्षा मोठा नाही. प्रसिद्धी…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*“मी आधी वारकरी, मग राजकारणी”* – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यां सन्मानपत्र देवुन झाला गौरव ; 500 पेक्षा जास्त कीर्तनकारांची उपस्थिती *पाळधी /जळगाव प्रतिनीधी दि. 25 ऑक्टोंबर – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या भावनिक आणि विनोदी शैलीत सर्व वारकऱ्यांची मने जिंकली. “मी आधी वारकरी आणि मग राजकारणी आहे. कीर्तनकारांची सेवा हीच माझी ऊर्जा आहे. जीवात जीव असेपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणार आहे. जिल्ह्यातील वारकरी व कीर्तनकार समाजासाठी हा मेळावा संघटनात्मक सशक्तीकरणाचा नवा अध्याय असून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच समाधान राजकारणा पलीकडे पात्र आणि गरजू व्यक्तींना मदत करणे हेच माझे धर्मकार्य आहे. प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. कीर्तन हे…
*“संबंधांच्या उजेडात झळकलेले दीप – समाजसेवेतून दिवाळीचा आत्मिक आनंद अनुभवणारे ना. गुलाबराव पाटील”* पालकमंत्र्यांच्या प्रेरणेतून पाळधीत जी.पी.एस. मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या उपस्थितीने “दिपावली स्नेह मिलन सोहळा” उत्साहात पार *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. २२ ऑक्टोंबर – “दिवाळीचा खरा आनंद एकत्र येण्यात आहे. माझे कार्यकर्ते, मित्र आणि गावकरी हेच माझं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या सोबत बसून फराळ करणे म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. राजकारणातले संबंध नव्हे, तर मनाचे नातेच माणसाला श्रीमंत बनवतात. असे भावनिक उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधताना काढले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत बसून फराळाचा आनंद घेतला, जुन्या मित्रांशी…
भाऊबीजेच्या शुभदिनी चोपड्यात भावबंधाचे सोहळे 🌸 *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणी निर्जलाताई देशमुख व सुशीलाताई गुजर यांच्याकडे जाऊन साजरी केली भाऊबीज* *चोपडा /जळगाव प्रतिनिधी दि. 23 ऑक्टोंबर – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर्षीची भाऊबीज अत्यंत आपुलकीच्या वातावरणात चोपडा येथे आपल्या दोन्ही बहिणी – सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर यांच्या घरी साजरी केली. यावेळी उपस्थित कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भावंडांतील प्रेम, स्नेह आणि आत्मियतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.* या प्रसंगी नगरसेवक आबा देशमुख, राजाराम पाटील, भैय्या पवार, विजय देशमुख, भरत देशमुख तसेच गुजर व देशमुख परिवारातील सदस्य मोठ्या उत्साहात उपस्थित होते. बहिणींनी आरती ओवाळून…
*आई-वडिलांना विसरू नका; तुमच्यामुळे त्यांचं नाव उजळलं पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आई-वडील हेच खरे दैवत; वेळेचा सन्मान करा आणि व्यसनांपासून दूर राहा – व्याख्याते डॉ. विनोद बाबर *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. 19 ऑक्टोबर – “आई – वडिलांना कधीच विसरू नका. मुला-मुलींनी असं नाव कमवा की तुमच्यामुळे आई-वडील ओळखले गेले पाहिजेत.ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल त्यात झोकून द्या. नेहमी आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि संस्कारांचे मूल्य जपा. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं अतूट असतं. गुरुचं आशीर्वाद आणि पालकांचं संस्कार हेच यशाचं खरं रहस्य असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* धरणगाव तालुक्यातील सुमारे 270 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य…
*पाळधी पोलीस इमारत सुरक्षिततेचे मंदिर – पालकमंत्री गुलाबराव पाटील* उत्तर महाराष्ट्रातील पहिले ‘लिफ्टयुक्त’ पोलीस स्टेशन उभे *पाळधी/जळगाव प्रतिनिधी, दि. १८ ऑक्टोबर – पूर्वी कार्यकर्ता म्हणून आंदोलनात पोलिसांशी सामना व्हायचा, आज मंत्री म्हणून त्यांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी मिळतेय, हे माझं भाग्य आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही आणि पुढेही भासू देणार नाही. ‘पाळधी दूरक्षेत्र’ ही इमारत म्हणजे सुरक्षिततेचे मंदिर आहे. डीपीडीसीमार्फत चार कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करून हे स्वप्न साकार केलं आहे. मी नेहमी सांगतो, जनता आणि पोलिसांमध्ये भीतीचं नाही तर विश्वासाचं नातं असावं. नागरिक पोलीस स्टेशनमध्ये आला, तर त्याला आधार, आदर आणि आत्मविश्वास वाटावा – हाच…
*“एक दिवस आयुष्य प्रसाद हे मुख्य सचिव होतील” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन* *जळगाव प्रतिनीधी दि. १७ ऑक्टोंबर – “सर्वसामान्य जनतेची कामे करणारा आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मावळते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या कार्याचे कौतुक केले. ते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या निरोप समारंभात व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते.* *एक दिवस मुख्य सचिव होतील आयुष्य प्रसाद* पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने सर्व विभागांना सोबत घेऊन, एकसंघपणे काम केले पाहिजे. आयुष्य प्रसाद यांनी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी सर्व…
*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा -जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल ३०० कोटींचे अनुदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील* मुंबई / पाळधी/जळगाव | १८ ऑक्टोबर २०२५ राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा सखोल आढावा घेत शासनाने राज्यातील पाच विभागांतील प्रभावित शेतकऱ्यांसाठी एकूण ३२५८५६.४७ लाख रुपये (३,००० कोटींपेक्षा अधिक) इतक्या मोठ्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्याला तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला असून, हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) वितरीत केला जाणार आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना…
*“बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *नशिराबाद/ जळगाव प्रतिनीधी दि. 17 ऑक्टोंबर – बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* नशिराबाद येथे महिलांसाठी ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र तयार होणार आहे.…
*शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक – गुलाबराव पाटील* “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार” – व्याख्याते विठ्ठल कांगणे ७५० शिक्षकांचा झाला सन्मान : अडीच तास हसले शिक्षक *पाळधी / जळगाव प्रतिनिधी, दि. १२ ऑक्टोबर: “विद्यार्थ्यांच्या घडविण्यात आई – वडिलांबरोबरच शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. शिक्षक म्हणजे समाजाचा आत्मा असून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे आशीर्वाद असतात, म्हणून मला शिक्षकांविषयी खूप अभिमान आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवणे हे आजचे महत्त्वाचे आव्हान आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनी सांगितले की, जगातला सर्वश्रेष्ठ अनुभव हा गुरुचा…