Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगावात नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न *जळगाव, दि. ४ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती २०२५ अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील उमेदवार, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) लिपिक टंकलेखक भरती २०२३ मधून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेश वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन…

Read More

📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर मुंबई, दि. १ ऑक्टोबर : राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण निश्चिती/सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश कांकोणकर यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. जाहीर कार्यक्रमानुसार, अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण ठरविण्याचे काम ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करून जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावयाचा आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना व प्रसिद्धी केली जाणार आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली…

Read More

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची अखंड परंपरा म्हणजे दसरा मेळावा मुबंई ला होत असतो स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिक दसरा मेळावा निमित्ताने मुबंई ला जात असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्र मध्ये घवघशीत यश आल्याने विधानसभा निवडणुकी नंतर हा पहिला दसरा मेळावा मुबंई येथील गोरेगाव नेस्को सेंटर येथे पार पडत आहे यात प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी बांधवांचे शेतीचे व आर्थिक नुकसान झालेले असून सर्व शिवसेनेचे महाराष्ट्र राज्यातील मुख्य नेते आमदार ,खासदार दसरा मेळावा निमित्त साधून मदत म्हणून निधी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे सुपूर्द करनार आहेत तसेच विशेष म्हणजे आपल्या…

Read More

पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडून पाहणी तात्काळ मदत मिळणार पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी व गिरणा नदीला आलेल्या पूरामुळे चांदसर, रेल , लाडली, दोनगाव, आव्हाणी, टाकळी , धार, शेरी, चोरगाव, कवठळ या गावांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या वेळी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील सोबत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मा.सभापती सचिन पवार, नाटेस्वर पवार, संजय चौधरी व शेतकरी उपस्थित होते पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ८ दिवसाचा आत तात्काळ मदत करण्यात येईल

Read More

_नवरात्रीत रणरागिणींकडून मंत्री गुलाबभाऊंकडे आग्रहाची मागणी_ *हिवाळी अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करा !* *पाळधी (वार्ता) :-* ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मान‍वतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत, जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या ‘लव्ह जिहाद’ ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत, त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार…

Read More

*गावाची एकजूट हीच खरी ताकद ; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते डोम सभागृह बांधकामाचा शुभारंभ ! *धरणगाव तालुका प्रतिनिधी दि. 28 सप्टेंबर – गाव, वाडा-वस्तीचा विकास म्हणजेच राज्याचा विकास असतो. कल्याणे खुर्दच्या ग्रामस्थांनी गाव विकासासाठी दाखवलेली एकजूट हेच खरे सामर्थ्य आहे. आगामी काळात गावाच्या विकासाकरिता कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असा ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* कल्याणे खुर्द (ता. धरणगाव) येथे श्री सिताई माता मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या डोम (घुमट) सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार…

Read More

पाळधी – धरणगाव येथे विविध दुर्गा उत्सव मंडळात पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांतील विविध मंडळात आरती संपन्न यात पाळधी बु माळी वाडा येथील गुलालकिंग मित्र मंडळ, धरणगाव नवेगाव येथील भवानी दुर्गा देवी मंडळ, जागृती युवक मंडळ धरणगाव, जय भवानी माता मंदिर येथील नवीन डी पी बसविली,धरणगाव येथील मरी आई मंदिरात दर्शन, जय भद्रा मित्र मंडळ दीपक कोळी बस स्थानक पाळधी या वेळी धरणगाव येथील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पाळधी बु माळी वाडा मित्र मंडळ उपस्थित होते

Read More

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन झाला सत्कार !* अँड. शरद माळी यांची जळगाव जिल्हा उपजिल्हा प्रमुखपदी निवड *धरणगाव प्रतिनिधी दि.28 सप्टेंबर – धरणगाव येथील विधी तज्ञ अँड. शरद माळी यांची जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली असून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या सत्कार कऱण्यात आला.* शरद माळी हे गेली 17 वर्षे विधी तज्ञ म्हणून जळगाव व धरणगाव येथे कार्यरत आहेत. समाजकारणाशी निगडीत त्यांच्या सेवाभावी वृत्ती, प्रभावी वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये सक्रीय आहेत. *मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट* “धरणगाव हे शिवसेनेचे गड असून इथे संघटना…

Read More