*विकासाच्या बळावर नशिराबाद नगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पंकज महाजन, लीना महाजन व कैलास व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश *नशिराबाद / जळगाव प्रतिनिधी दि. ९ नोव्हेंबर – “नशिराबाद म्हणजे एकतेचं प्रतीक आहे. सगळे जाती धर्माच्या नशिराबाद करांची एकजूट, हीच खरी ताकद आहे. मी नशिराबादवर प्रेम केलं ते शब्दांत नाही, तर कृतीतून दाखवलं. नशिराबादचा चेहरामोहरा बदलवायचा, हा माझा संकल्प आहे. विकासाच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादाने नशिराबाद नगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा नक्की फडकणार ! असा ठाम विश्वास शिवसेनेचे जेष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* *शिवसेनेचा मेळावा उत्साहात संपन्न*…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*“दुःखातही साथ”* – *सहवेदनेचा हात”* जिपीएस मित्र परिवाराचा हृदयाला स्पर्श करणारा उपक्रम पाळधीकरांच्या भावनांना स्पर्श करणारी संवेदनशील समाजसेवेची नवी दिशा *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. 8 नोव्हेंबर – “समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे” हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असलेला जिपीएस मित्र परिवार गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि मानवतावादी कार्यांद्वारे माणुसकीची उब जपण्याचे कार्य करत आहे. या सामाजिक प्रवासाला भावनिक स्पर्श देत त्यांनी नुकताच सुरू केलेला “दुःखातही साथ” हा उपक्रम पाळधीकरांच्या मनाला भिडला आहे.* थंडीच्या दिवसांत निराधारांना उबदार कपड्यांचे वाटप, रोज सुमारे २०० लोकांना मोफत भोजन, अपंग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप, विद्यार्थी गुणगौरव आणि गुरुजन सन्मान सोहळे, संत भोजन तसेच…
*मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकासकार्यातून तरुणाईचा ‘भगव्या’वर विश्वास !* राष्ट्रवादी – उ.बा.ठा. गटात खिंडार ! *पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. ८ नोव्हेंबर : शिवसेना ही फक्त राजकीय संघटना नसून एक विचार आणि कुटुंब आहे. या कुटुंबात जे पाऊल टाकतात, त्यांना विकास आणि सन्मान हमखास मिळतो, आज या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश करून विकासाचा मार्ग स्वीकारला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या प्रवेश सोहळ्यात केले.* जळगाव तालुक्यातील रायपूर व परिसरात आज शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली तरुणाईचा ओघ उसळला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांवर विश्वास ठेवून…
*बांभोरी गावं झाले एकसंघ – गावानं घेतली शिवबंधनाची शपथ !* पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर गावाचा पुन्हा ठाम विश्वास ! *पाळधी/धरणगाव प्रतिनिधी दि. 6 नोव्हेंबर – बांभोरीचं प्रेम मी कधी विसरणार नाही, सहा वेळांपैकी पाच वेळा या गावानं मला भरभरून साथ दिली. आज हेच गाव पुन्हा एकदिलानं शिवसेनेच्या भगव्या छत्राखाली आलं आहे. गावाला सन्मान मिळावा म्हणून पंचायत समिती सभापती व मार्केट कमिटी सभापती पदांचा मान दिला. बांभोरीचा विश्वास कायम राखणं हे माझं कर्तव्यच आहे. असं भावनिक प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. ते बांभोरी येथे झालेल्या भव्य शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…
*जिपीएस मित्र परिवार च्या नेत्र शिबीर ला प्रचंड प्रचंड प्रतिसाद अभूतपूर्व गर्दी* मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून व जि प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जिपीएस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आज पर्यंत चे शिबिर चे सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली आज या शिबीर मध्ये ८१० रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी २१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात…
*जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक पार* केळी पीकविमा, निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी ठोस चर्चा *मुंबई,/जळगाव प्रतिनिधी दि. 5 नोव्हेंबर – जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि केळी निर्यात क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी आज मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पणन व राजशिष्टाचार जयकुमार रावल तसेच रावेरचे आ.अमोल जावळे यांच्यासह पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग, सहकार व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.* बैठकीत केळी पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे तसेच जिल्ह्यातील केळी निर्यात…
*“डंके की चोट पे ही निवडणूक जिंकणार” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा निर्धार* “कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर हमी *धरणगाव (प्रतिनिधी) दि. 3 नोव्हेंबर – “धरणगाव तालुक्यात गेली पंचवीस वर्षे भगवा झेंडा फडकत आहे. नगरपालिकेवर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. पोटनिवडणुकीतही शिवसेनेचाच विजय झाला. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभा आहे.असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. केलेला विकास प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. युती बाबतची जबाबदारी माझ्यावर सोपा. कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवा. ‘डंके की चोट पे ही निवडणूक जिंकणारच !’ असा मी…
*“भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा – पालकमंत्री गुलाबराव पाटील”* *किंवा* *भुसावळ म्हणजे शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन – पालकमंत्री गुलाबराव पाटील”* बुथ मजबूत करा : एकजुटीने काम करण्याचा निर्धार *भुसावळ प्रतिनिधी दि. २ नोहेंबर – भुसावळ शहर व तालुका हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून “भुसावळ फक्त रेल्वे जंक्शन नाही, तर शिवसेनेचा जनादराचे जंक्शन आहे. १९९१ पासून आजपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तीन नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांवर भगवा फडकलेला आहे. पूर्वीप्रमाणेच भुसावळला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हावे. “सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीचा विचार असून , “नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी…
*कुंभार समाज कष्टाळू आणि एकजुटीचा – त्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील* धरणगावात संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ! कुंभार समाजासाठी ३५ लाखांचा निधी – एकजुटीच्या बळावर साकारले भव्य दिव्य सभागृह *धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि. 1 नोहेंबार – “कुंभार समाज हा मेहनती आणि प्रामाणिक समाज आहे. त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. धरणगावमध्ये आतापर्यंत अनेक सामजिक सभागृहे मंजूर केली असून त्यातील हे पहिले सभागृह लोकार्पित होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. समाज बांधवांनी एकजुटीने काम करावे आणि या सभागृहाचा उपयोग समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी करावा.* पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता…
*स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी* *पाळधी* : मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पशा आजाराने अनिल महाजन यांचं निधन झालं होतं. त्या काळात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आणि त्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता…