Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील* २६ ग्रामपंचायतींना ISO मानांकन : सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान *धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) | दि. १६ डिसेंबर – गाव पातळीवरील प्रशासन सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख झाले तरच तालुका, जिल्हा आणि अख्खा महाराष्ट्र सक्षम होतो. पंचायतराज व्यवस्था ही लोकशाहीचा कणा असून गावाच्या विकासाची खरी सुरुवात ग्रामपंचायतीपासून होते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत धरणगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी धरणगाव तालुक्यातील ISO मानांकन प्राप्त २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य…

Read More

*विज्ञान प्रदर्शन म्हणजे उद्याच्या प्रगत भारताची पायाभरणी – पालकमंत्री गुलाबराव पाटील* शिरसोली येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न *शिरसोली प्र. बो./ जळगाव प्रतिनिधी | दि. १५ डिसेंबर – विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा किंवा महागडी उपकरणे नसून प्रश्न विचारण्याची सवय, जिज्ञासा आणि चिकाटी म्हणजेच खरे विज्ञान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिरसोली येथे आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे प्रयोग हे खेळणी नसून उद्याच्या प्रगत भारताची पायाभरणी असल्याचे सांगत, आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सी. व्ही. रमण आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम दडलेले आहेत, विद्यार्थ्यांनी “मला जमणार नाही” किंवा “हे माझ्याने होणार नाही” हा…

Read More

*शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ४ तासांच्या मॅरेथॉन मुलाखती !* जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची जोरदार तयारी ! *सुमारे ३०० इच्छुक उमेदवारांचे अर्ज, सर्वांची सखोल मुलाखत !* मुलाखतींसाठी इच्छुक महिला उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय ! *‘धर्मवीर आनंद दिघे नगरी सहाय्यता कक्ष’ प्रशिक्षण कार्यशाळेत निवडणूक रणनीतीचे मार्गदर्शन !* *जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी १९ प्रभागांतून ७५ नगरसेवक निवडले जाणार असून, निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे.* या पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ शिवसेना…

Read More

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) *पिंप्री खुर्द येथे ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण युवकांना रोजगाराची नवी दिशा *पिंप्री खुर्द/पाळधी प्रतिनीधी दि. १४ डिसेंबर -“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक गावात असे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तर स्थानिक रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या योजनेंतर्गत पिंप्री येथे स्वामी कुल्फी उद्योग केंद्रामुळे १५ ते २० स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*…

Read More

पाळधी बाजार चौकात काँक्रिटीकरण कामाची पाहणी – जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांची उपस्थिती पाळधी येथे बाजार चौकात सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील यांनी केली. या कामामुळे पाळधीकरांना वाहतूक, पावसाळ्यातील चिखल, धूळ तसेच बाजारातील दैनंदिन अडचणींपासून मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामामुळे पाळधीकरांची मोठी सोय होणार असून बाजार चौकाचे स्वरूप अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीत होणार आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Read More

‘गुलाबभाऊ देवासारखे मदतीला’ — भाविक मायाबहिणींचा भावनिक प्रतिसाद अयोध्या यात्रेकरूंच्या बस अपघातानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी सर्व भाविक सुखरूप कल्याणे खु. येथे परत धरणगाव तालुक्यातील कल्याणे खु. येथील अयोध्या यात्रेकरूंना झालेल्या बस अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर इतर काही भाविक जखमी झाले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून सर्व भाविकांना सुरक्षितपणे परत आणण्याची जलद आणि प्रभावी व्यवस्था केली. भाविक सुखरूप गावी परतल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या वेळी भाविक मायाबहिणींनी भावूक होत म्हणाले— “परराज्यात आमच्यावर मोठे संकट…

Read More

*जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा : औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जिल्ह्याला मिळाली मोठी औद्योगिक गती विदर्भ–मराठवाडा धर्तीवर मिळणार औद्योगिक प्रोत्साहन *पाळधी* प्रतिनिधी दि. 11 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर नवी क्रांती घडवणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जळगाव MIDC ला D+ झोनमध्ये समाविष्ट करून विदर्भ – मराठवाडा प्रमाणेच औद्योगिक प्रोत्साहन देण्यास शासनाने औपचारिक मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी दिलासादायक घोषणा ठरली आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.* *सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय* या ऐतिहासिक निर्णयासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात सातत्याने…

Read More

*जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा : औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जिल्ह्याला मिळाली मोठी औद्योगिक गती विदर्भ–मराठवाडा धर्तीवर मिळणार औद्योगिक प्रोत्साहन *पाळधी* प्रतिनिधी दि. 11 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर नवी क्रांती घडवणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जळगाव MIDC ला D+ झोनमध्ये समाविष्ट करून विदर्भ – मराठवाडा प्रमाणेच औद्योगिक प्रोत्साहन देण्यास शासनाने औपचारिक मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी दिलासादायक घोषणा ठरली आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.* *सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय* या ऐतिहासिक निर्णयासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात सातत्याने…

Read More

जिपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद; ८१० रुग्णांची तपासणी, २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड पाळधी : मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी सात वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात एकूण ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती.…

Read More

*अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद* निवास, भोजन, उपचार आणि सुरक्षित परतीच्या प्रवासाची सर्व व्यवस्था युद्धपातळीवर *जळगाव (जिमाका) दि. ७ : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे. अपघातानंतर जखमी व सुरक्षित सर्व भाविकांना प्रशासनाने रेल्वेच्या स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.* जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच अयोध्या येथील अपघाताची माहिती घेऊन तातडीने प्रशासनाला जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर समन्वय…

Read More